शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (14:56 IST)

शिंदे गटात सहभागी व्हा अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू

vivek pansare
नवी मुंबईच्या एका माजी नगरसेवकाने शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. माजी नगरसेवक एम. के मढवी म्हणाले की, मागील २ महिन्यापासून शिंदे गटाकडून माझ्यावर त्यांच्यासोबत येण्यासाठी दबाव टाकला आहे. माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची नोटीस देत कुटुंबापासून दूर करण्याचा डाव आखला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मला शिंदे गटात सहभागी व्हा अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू अशी धमकी देत १० लाख रुपये देण्याची मागणी केली. या प्रसंगामुळे माझ्यावर मानसिक दडपण आले आहे असं त्यांनी म्हटलं.
 
तसेच मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. शिंदे गटात सहभागी झाले नाही तर एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करून तडीपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर माझ्यावर अशी कारवाई होत असेल तर मी, माझं कुटुंब, साडेतीन वर्षाची नात, २ मुले, सुन, पत्नीसह आत्महत्या करू. आमच्या जीवाला कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार विवेक पानसरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदीप नाईक, विजय चौगुले जबाबदार असतील असा इशारा एम. के मढवी यांनी दिला आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor