शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (14:50 IST)

मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं

kishori pednekar
किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. तसेच शनिवारी पुन्हा चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यामध्ये चार जणांना अटकही करण्यात आली. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यावरून आता मनसेने बोचरी टीका केली आहे. 
 
“मांजर लपून दूध पीत होती... महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन 'भारती सिंग'” असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनाखोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे...”
 
Edited by: Ratnadeep Ranshoor