Daily Horoscope
✕

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

Updated: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (08:08 IST)
 
अधिक माहितीनुसार, वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिक यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. तसेच ईडीच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सांगितले आहे की, प्राथमिकदृष्ट्या याप्रकरणी तपास यंत्रणांनी जे पुरावे गोळा केले होते, त्यानुसार त्यांच्यावरील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी काही महिने सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने आज निकाल दिला आहे.
 
नवाब मलिकांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यामुळे पुढील निर्देश येईपर्यंत त्यांच्यावरील उपचार सुरुच राहणार आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटळण्यात आला असला तरी त्यांची रवानगी लगेच तुरुंगामध्ये होणार नसून ते रुग्णालयातच उपचार घेणार आहेत. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात आता तातडीने हायकोर्टात धाव घेणार असल्याचे मलिकांच्या वकिलांनी सांगितले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

शिवराज सिंह चौहान यांनी कोणाला म्हटले ‘नरपिशाच’? मोहन यादव सरकारविरोधात माजी मुख्यमंत्री यांनी धरणे आंदोलन का केले?

LIVE: धर्म लपवून खोट्या ओळखीने गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबईत १७ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने वडिलांच्या मित्राकडून हत्या केल्याचा आरोप

जॉईंट खात्यात एटीएम कार्ड कोणाला मिळते? बँकेचे महत्त्वाचे नियम वाचा

कुत्र्याच्या नखाचा ओरखडा दुर्लक्ष करणे जीववर बेतले, १४ वर्षांच्या मुलाच्या रेबीजने मृत्यू

पुढील लेख
Show comments