शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025 (10:57 IST)

वसई-विरारमध्ये पाणी भरण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद: महिलेने डास प्रतिबंधक स्प्रे फवारल्याने व्यक्तीचा मृत्यू

Pepper Spray
वसई-विरारमध्ये पाणी भरण्यावरून दोन शेजाऱ्यांमधील वाद इतका वाढला की महिलेने डासनाशक फवारणी केली, त्यामुळे शेजाऱ्याचा मृत्यू झाला. अशी माहिती समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार वसई-विरारमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असतानाच विरारमधील एका गृहनिर्माण संकुलातून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन शेजाऱ्यांमध्ये पाणी भरण्यावरून वाद झाला. भांडण इतके वाढले की, इमारतीत राहणाऱ्या महिलेने रागाच्या भरात शेजाऱ्याची हत्या केली. उमेश पवार (५३) आणि कुंदा तुपेकर (४७) ही कुटुंबे विरार पश्चिम, जेपी नगर परिसरात असलेल्या १५ क्रमांकाच्या इमारतीत राहतात. पाणी भरण्यावरून दोन कुटुंबात भांडण सुरू होते. मंगळवारी रात्रीही उमेश पवार (५३) आणि कुंदा तुपेकर (४७) यांच्यात पाणी भरण्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच क्षुल्लक कारणावरून सुरू झालेली भांडणे गंभीर पातळीवर पोहोचली. दरम्यान, संतप्त झालेल्या कुंदा तुपेकर यांनी घरातून डास प्रतिबंधक स्प्रे आणून थेट उमेश पवार यांच्या चेहऱ्यावर फवारले. फवारणीच्या तीव्र वासामुळे उमेश पवार बेशुद्ध होऊन तेथेच पडला. अचानक बेशुद्ध पडल्याने उमेश पवार यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अनारनाळा सागरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.