Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यामध्ये 500 रुपयांसाठी एकाची हत्या

Updated: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (16:50 IST)
 
पोलीस अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी गंगारामपाडा येथील सुरेश तारासिंग जाधव (वय 35) यांचा अर्धवट जळालेला मृतदेह वडपे गावच्या परिसरात आढळून आला होता. तसेच पोलिसांनी प्रथम अज्ञात लोकांविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर माहिती आणि पुराव्यांच्या आधारे गुन्हे शाखेने आरोपी बारकू मारुती पडवळे याला अटक केली आहे.
 
तसेच चौकशी केली असतात त्याने एका साथीदारासोबत मिळून जाधव यांचा खून केल्याचे उघड झाले. साथीदाराला अजून अटक करण्यात आलेली नाही. तिघेही भंगार विक्रेते म्हणून काम करायचे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी 500 रुपये उसने घेतले होते, ते वारंवार सांगूनही ते परत करत नव्हते.खुनाच्या दिवशी  जाधव यांना वडपे गावात नेऊन आरोपींनी पैशाची मागणी केली. कर्जावरून वाद वाढल्याने दोघांनी जाधव यांच्यावर लोखंडी रॉडने वार केले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह डस्टबिनमध्ये टाकून पेटवून दिला.अशी माहिती समोर आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

एफडीएने नागपूरमधील परवानाधारक मेडिकल स्टोअरवर छापा टाकला

मुंबईत एका गाडीच्या बोनेटमध्ये सात फूट लांबीचा अजगर लपलेला आढळल्याने खळबळ

फातिमा सनाने शेफाली वर्माला केलेला हाताचा इशारा महागात पडला

LIVE: टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण

टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण, बीएमसी प्रस्ताव रद्द करण्याच्या तयारीत

पुढील लेख
Show comments