रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (10:22 IST)

स्मिता ठाकरे यांची शिंदे सरकारने केली चित्रपट धोरण समितीच्या अध्यक्षपदी निवड

smita thachkeray
Instagram
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मिता ठाकरे यांच्या वर नवीन जबाबदारी दिली.
स्मिता ठाकरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनआहे.

शिंदे सरकारने त्यांच्यावर नवीन जबाबदारी दिली असून त्यांची निवड चित्रपट धोरण समितीच्या अध्यक्षपदी केली आहे. 

स्मिता ठाकरे या शिवसेने उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भावजय असून अशा परिस्थितीत ठाकरे आणि शिंदे राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेत चित्रपट धोरण समितीची स्थापना केली असून अध्यक्षपदी स्मिता ठाकरे यांची निवड केली आहे. 

स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहे. दोघांचा घटस्फोट झाला असून त्या हिंदी चित्रपट तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात खूप काम करतात. 
शिंदे सरकारच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात गदारोळ होण्याची शक्यता आहे. 
Edited By - Priya Dixit