Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील शाळा अनिश्चित काळासाठी बंद राहणार

Updated: शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:54 IST)
 
राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी या शिक्षण मंडळाना मुंबईमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्यास नुकतेच मुंबई महापालिकेने परवानगी दिली होती. त्याचवेळी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग १८ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.  मात्र अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची पसरलेली दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व सर्व विद्यालये १६ जानेवारीपासून मुंबई महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 
शाळा बंद ठेवण्याच्या सूचनेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शिक्षण निरीक्षक, उपशिक्षणाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी (शाळा), पालिका क्षेत्रातील महापालिका प्राथमिक व माध्यमिक, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

सोलापूरहून कर्नाटकला येणाऱ्या ट्रेनमध्ये सीटखाली महिलेचा मृतदेह आढळला

फोनवर बोलत असलेल्या महिलेने आपल्या कारखाली ८ वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यू

LIVE: अभिजीत दीपक यांचा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला उघडपणे पाठिंबा

नागपूर समृद्धी महामार्गावरील वाहतूक ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

मुंबई बंदरावर एक मोठा अपघात, क्रेन जहाजाला धडकली दोन ऑपरेटर जखमी

पुढील लेख
Show comments