Daily Horoscope
✕

मुंबईतील शाळा या एक दिवसाआड सुरु करण्यात येणार

Updated: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (15:59 IST)
 
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असून मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबतची माहिती दिली आहे. पाललकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात येणार असल्याचे पेडणेकर यांनी म्हटलं आहे. पालकांनी शाळेशी आणि शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करावा, जेणेकरुन संमीत पत्र मिळेल ते भरुन शाळेत जमा करावे. तेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात येईल. महानगरपालिकेच्या शाळा आरोग्य सेंटरला कनेक्ट राहतील ज्या शाळा खासगी आहेत त्यांनी महानगरपालिका आरोग्य सेंटरशी कनेक्ट राहाव अन्यथा खासगी आरोग्य सेंटरशी कनेक्ट राहणे गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी खोकला झाल्याची लक्षणे दिसल्यास त्याला रुग्णालयात नेले पाहिजे, आरोग्याची काळजी घेणे त्याची लक्षणे, विद्यार्थ्यांवर शाळा प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
 
सुरक्षितता आणि दक्षता घेणे गरजेचे आहे. शाळेत ५० विद्यार्थी असतील आणि सर्व विद्यार्थ्यांना घरुन परवानगी मिळाली तर त्यांना दोन सत्रात बोलवण्यात येईल एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्यात येईल. विद्यार्थ्याला मास्क, सॅनिटायझर देऊ परंतु विद्यार्थ्यांसोबत एक अधिक मास्क आणि सॅनिटायझर ठेवावे असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० जमा होण्यास सुरुवात झाली

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकॅडमी अमरावतीमध्ये सुरू होणार

नागपूरमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला

घरबसल्या ट्रेनने पार्सल पाठवा! रेल्वेची घरपोच वितरण सेवा मुंबई आणि पुण्यासह ८ शहरांमध्ये सुरू होणार

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली

पुढील लेख
Show comments