शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (15:56 IST)

राज कुंद्राला अटक का करावी लागली, सरकारी वकिलांनी सांगितले हे कारण

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा अश्लील चित्रपटासंदर्भातील पुरावे नष्ट करत होता. अश्लील चित्रपट बनवून ते अॅपवर प्रसारित करत असलल्यामुळेच त्याला अटक करावी लागली, असे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितले.राज कुंद्राने अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी झाली. त्यादरम्यान सरकारी वकिलांनी त्याच्या अश्लील चित्रपटाच्या व्यवसायाबाबतची माहिती उघड केली. उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय राखीव ठेवला आहे. या प्रकरणावर निर्णय नंतर जाहीर करणार आहे.
 
आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत राज कुंद्राने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. सरकारी वकील अरुणा पै यांनी राज कुंद्राच्या अश्लील व्यवसायाबाबत अनेक दावे केले आहेत. राज कुंद्राला अटक करणे का गरजेचे आहे, याबाबतचे अनेक तथ्य सांगत त्यांनी अटकेचे समर्थन केले. राज कुंद्रा ब्रिटिश नागरिक आहे. तो पुरावे सारखे नष्ट करत होता. त्यावर पोलिसांनी मूकदर्शक राहावे का, असा सवाल त्यांनी केला.
 
कुंद्राचे वकील आबाद पोंडा यांनी पोलिसांच्या दाव्याचे खंडन केले. आपल्या पक्षकाराला भादंविच्या कलम ४१ (अ) नुसार नोटीस बजावली होती. परंतु त्यांना उत्तर देण्यास वेळ देण्यात आला नाही, असे या प्रकरणातील दुसरा आरोपी रायन थॉर्पचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी सांगितले. कुंद्रा हॉटशॉप अॅपचे अॅडमिन आहे. झडतीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. कुंद्राच्या लॅपटॉपवरून यूजर फाइल्स, ईमेल्स, मेसेज, फेसटाइम, इंटरनेट ब्राउजिंग हिस्ट्री सापडली आहे. त्यामध्ये सब्सकायबरची संपूर्ण माहिती आणि वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हॉइससुद्धा मिळाले आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला.
 
गुन्हे शाखेला स्टोरेज नेटवर्कमधून ५१ अॅडल्ट चित्रपट आणि ६८ अश्लील चित्रपटेही सापडले आहेत. त्याशिवाय सेक्स्युअल कंटेंटसह चित्रपटाच्या स्क्रिप्ट सापडल्या आहेत. राज कुंद्राने भादंवि कलम ४१(ए) च्या नोटिशीवर हस्ताक्षर करण्यास नकार दिल्यामुळे त्याला अटक करावी लागली. कुंद्रा आणि त्याची कंपनी वियान इंडस्ट्रिजचे आयटी प्रमुख रायन थॉर्पला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैला अटक केली होती. त्यानंतर दोघेही न्यायालयाच्या आदेशापासून २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत राहिले.