Festival Posters

नाईट लाईफवरुन मुख्यमंत्र्यांचं टीकाकारांना उत्तर, तर बुलेट ट्रेनवरुन ठणकावलं

Updated: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (16:24 IST)
 
मराठवाडा काही वर्ष सतत दुष्काळाचा सामना करतो आहे. पाण्याचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या आहे. पंकजांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला म्हणून धन्यवाद. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सरकार संवेदनशील आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पंकजा मुंडे यांचे आंदोलन सुरू होण्याआधीच सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
 
नाईट लाईफवर विरोधकांना उत्तर
नाईट लाईफच्या टीकाकारांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. नाईट लाईफ हे कष्टकऱ्यांसाठी आहे असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. नाईट लाईफचा अर्थ केवळ पब, बारपुरता संकुचित नाही असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. ‘नाईट लाईफमध्ये लाईफ हा शब्द महत्त्वाचा आहे. मुंबई झोपत नाही म्हणतात. तर अशा कष्टकऱ्यांना जर त्यांना आवश्यक असलेलं जेवण उपलब्ध करुन द्यायच्या की नाही द्यायच्या. मुंबईकर घरी थकून येतो तेव्हा थकलेला असतो. पण जेव्हा तो बाहेर पडतो. तेव्हा सगळं बंद असतं. विरोधी पक्ष जरी झोपत असले तरी पोलीस २४ तास जागा असतो. पोलीस जागतात म्हणून आपण झोपतो. रात्रीच्या वेळेचा वापर चांगल्या कामासाठी होऊ शकतो. इतर सेवा सुरु असतात. रात्री पाळी असते. मग दुकानं का उघडी असू नयेत,’ असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
 
बुलेट ट्रेनवरुन टीका
बुलेट ट्रेनचा उपयोग खरंच कोणाला होणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  उद्योगधंद्याला खरंच चालना मिळणार आहे का याचा विचार व्हायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून ठणकावलं आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments