Dharma Sangrah
✕

जम्मू -काश्मीर: भारतीय सैन्याला मोठे यश, घुसखोरी करणारा दहशतवादी ठार झाला व दुसर्‍याने केले समर्पण

Updated: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (16:22 IST)
 
लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सशस्त्र दलांना हिवाळा सुरू होण्यापूर्वी घुसखोरीच्या धोक्याची माहिती मिळाली आहे. या काळात हा परिसर पूर्णपणे बर्फाने झाकलेला असतो.याशिवाय लष्कर मंगळवारी दुपारी 1 वाजता सुरू असलेल्या उरी मोहिमेवर पत्रकार परिषद घेणार आहे. लष्कर शरण आलेल्या दहशतवाद्याला दाखवेल,असे सूत्रांनी सांगितले आहे.
 
यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराने जम्मू -काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर उरीजवळील रामपूर सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय लष्कराने सांगितले की, जवानांनी त्यांना पाहिले तेव्हा दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान गोळीबार सुरूझाला. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
 
घुसखोरीचा दुसरा प्रयत्न लष्कर
लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मते, या वर्षी घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे. तथापि, लष्कराच्या एका वरिष्ठ कमांडरने सांगितले की या वर्षी सीमेपलीकडून कोणतेही युद्धबंदी उल्लंघन आणि चिथावणी दिलेलीनाही.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments