गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (11:58 IST)

नकारात्मक शक्तींना पळवून लावणारी कालाष्टमी

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते.  या दिवशी भगवान शंकराच्या रुद्ररुप भगवान कालभैरवाची पूजा केली जाते. भगवान भैरव, भगवान शिव यांचे अवतार आहे. कालाष्टमीला भैरवाष्टमी नावाने देखील ओळखलं जातं. या पवित्र दिवशी भगवान भैरवाची पूजा केल्याने मृत्युची भीती नाहीशी होते आणि पापांचा नाश होतो. भगवान भैरव सर्व प्रकाराच्या आजरांपासून मुक्ती देतात. या दिवशी व्रत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
कालाष्टमीला भैरवासह देवी दुर्गाची पूजा करावी. कालाष्टमीला काली देवीची पूजा करण्याची देखील पद्धत आहे. शक्ति पूजा केल्याने भगवान भैरवाची पूजा केल्याचं संपूर्ण फल प्राप्त होतं. या दिवशी विधीपूर्वक शिवाची पूजा करावी. भगवान शिव यांच्यासोबत देवी पार्वती आणि भगवान श्रीगणेशाची उपासना करावी. 
 
या प्रकारे करा पूजा
कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र घालावे.
पूजा स्थळी गंगेचे पाणी शिंपडावं आणि स्थान शुद्ध करावं.
नंतर कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी.
फुले, नारळ, इमरती, पान इत्यादी अर्पण करावं.
भगवान कालभैरवासमोर धूप-दीव लावावी.
भैरव मंत्रांचा 108 वेळा जप करावा.
आरती करावी.
भैरव चालीसा पाठ करावा.
 
या दिवशी कालभैरवाची खरी भक्तिभावाने उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला भोजन द्यावं. असे केल्याने बाबा प्रसन्न होतात. 
भगवान शिवाचे दोन रुप सांगितले गेले आहेत- बटुक ​भैरव आणि काल भैरव. बटुक भैरव सौम्य आहे तर काल भैरव रौद्र रूप. मासिक कालाष्टमीला रात्री पूजन करावं. रात्री चंद्राला अर्घ्य द्यावं. भगवान भैरवची उपासना केल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभाव नाहीसा होतो. सर्व प्रकाराच्या दोषांपासून मुक्ती मिळते.