suvichar
✕

या 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री

Updated: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (16:50 IST)
 
पक्ष रक्षणकर्ता : अशोक गहलोत दोनदा राजस्थानचे मुख्यमंत्री राहून चुकले आहे आणि पक्षाचे अनुभवी नेता आहे. ते कठिण परिस्थितीत पक्षाचे रक्षणकर्ता बनलेले आहेत. तरी 2013 विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात पक्षाला अपयश हाती लागले होते. तरी पक्षाने जोशऐवजी अनुभवाला प्राधान्य दिले.
 
जमिनीशी जुळलेले : अशोक गहलोत यांना प्रदेशाच्या राजकारणात जमिनीशी जुळलेला नेते मानले गेले आहे. पुष्कळ काळापासून राजकारणात सक्रिय गहलोत राजस्थानमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्यांना 'राजकारणाचा जादूगार' आणि 'मारवाडाचा गांधी' सारख्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
 
इंदिरा गांधींमुळे राजकारणात : अशोक गहलोत इंदिरा गांधींच्या काळातील नेते आहे. ते पूर्वोत्तर क्षेत्रात शरणार्थींमध्ये चांगले काम करत असून इंदिरा त्यांच्या कामाने खूप प्रभावित होत्या. 1974 मध्ये ते एनएसयूआय अध्यक्ष बनले. ते 1979 पर्यंत या पदावर राहिले. 1979 ते 1982 पर्यंत ते काँग्रेस पार्टीचे जोधपुर जिला अध्यक्ष राहिले आणि 1982 मध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव बनले.
 
पाचदा खासदार, पाचदा आमदार : अशोक गहलोत पाचदा खासदार आणि पाचदा आमदार म्हणून निवडले गेले. ते केंद्र आणि राज्य दोन्ही जागी मंत्री पद सांभाळून चुकले आहे. अशोक गहलोत तीनदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. सचिन पायलट यांच्या तुलनेत त्यांना राजकारणात खूप अनुभव आहे.
 
लोकसभा निवडणुका : लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पक्षाला तिन्ही राज्यांच्या नेतृत्व अनुभवी नेत्यांच्या हाती द्यायचे होते. या कारणामुळेच मध्यप्रदेशात कमलनाथ आणि राजस्थानमध्ये गहलोत यांना संधी देण्यात आली. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया पक्षाचे भविष्यातील मजबूत स्तंभ मानले जात आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments