शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (13:04 IST)

बहराइचमध्ये पकडला गेला हल्ला करणारा लांडगा

wolf
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये गेला काही दिवसांपासून लांडग्याच्या दहशतीमुळे लोक घाबरले आहे. तसेच पोलिसांसोबतच वनविभागाचे पथकही लांडग्यांच्या शोधात शोधमोहिमेत गुंतले आहे. लांडग्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे, तसेच 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहे. वनविभागाच्या अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार एक लांडगा अजून शिल्लक असून त्याचा शोध सुरू आहे.
 
तसेच लांडग्यांचे सततचे हल्ले पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर लांडग्यांना पकडण्याचे निर्देश दिले होते. तसेच यासाठी प्रशासनाने लांडग्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली होती. एवढेच नाही तर ड्रोनच्या माध्यमातून लांडग्यांवरही नजर ठेवली जात होती.
याशिवाय मानवभक्षक लांडग्यांना पकडण्यासाठी या परिसरात पीएसीचे 200 जवान तैनात करण्यात आले होते. वनविभागाची सुमारे 25 पथकेही शोधकार्यात गुंतली होती. डीएफओ अजित प्रताप सिंह यांनी  सांगितले की, लवकरच सहाव्या लांडग्याला पकडण्याचा प्रयत्न करू.