झवेरी बाजारात ईडीकडून छापे
मुंबईतील झवेरी बाजारात काळा पैसा पांढरा करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचेही उघडकीस आले असून ईडीने या सराफांची झाडाझडती सुरू केली आहे. या परिसरातील चार सराफा व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) छापे टाकले आहेत. ‘ईडी’कडून छापा टाकण्यात आलेल्या या सर्व कंपन्या बुलियन ट्रेडर्स ( धातुंचे व्यापारी) आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर या सराफा व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल ६९ कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.