Daily Horoscope
✕

Chandrayaan 3: चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ पोहोचले, कक्षा बदलण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

Updated: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (21:56 IST)
 
विशेष म्हणजे 14 जुलै रोजी चांद्रयान-3 पृथ्वीवर प्रक्षेपित झाल्यानंतर5 ऑगस्ट रोजी, कक्षेतून बाहेर पडल्यानंतर, ते यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहोचले. 
 
"चांद्रयान-3 आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ आले आहे. चांद्रयान-3 ची कक्षा कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्याचे अंतर आता 174 किमी * 1437 किमी आहे." इस्रोने सांगितले की आता वाहनाची चंद्र कक्षा बदलण्याशी संबंधित ऑपरेशन 14 ऑगस्ट रोजी 11.30 ते 12.30 दरम्यान असेल. मिशन जसजसे पुढे जाईल तसतसे चांद्रयान-3 चांद्राच्या कक्षेत आणखी खाली आणण्याची प्रक्रिया पुढे नेली जात आहे, जेणेकरून ते चंद्राच्या ध्रुवावर पोहोचवता येईल.
 
15 जुलै रोजी चांद्रयान-3 ने पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केले. यानंतर 17 जुलै रोजी चांद्रयानने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत आणि 18 जुलै रोजी पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. यानंतर 20 जुलै रोजी चांद्रयानने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत आणि 25 जुलै रोजी पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. 1 ऑगस्ट रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारताच्या बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान-3 यानाचे पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेच्या दिशेने यशस्वी प्रक्षेपण केले. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत ठेवण्यात आले. यानंतर इस्रोने चांद्रयान-3 मधून काढलेली अनेक छायाचित्रेही शेअर केली आहेत. 
 
 श्रीहरिकोटा केंद्रापासून 35 तासांवर आणि जर सर्वकाही योजनेनुसार चालले तर ते 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. ही मोहीम चंद्राच्या त्या भागाकडे पाठवली जात आहे, ज्याला चंद्राची गडद बाजू म्हणतात. कारण हा भाग पृथ्वीच्या समोर येत नाही.





Edited by - Priya Dixit
 
 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments