शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (13:20 IST)

पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्याचं प्रकरणात काँग्रेस आमदाराला 99 रुपयांचा दंड

Congress MLA Anant Patel  tearing PM Modis photo  Congress MLA fined Rs 99  case of tearing PM Modis photo   Court at Navsari in Gujarat
गुजरातमधील नवसारी येथील न्यायालयाने काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना 2017 च्या एका प्रकरणात 99 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनात घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र फाडल्याचा आरोप पटेल यांच्यावर आहे.
वंसदा (ST) चे आमदार पटेल हे IPC च्या कलम 447 अंतर्गत गुन्हेगारी घुसखोरी केल्याबद्दल दोषी आढळले. 2017 मध्ये जलालपूर पोलिसात पटेल आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर सहा जणांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
न्यायालयाने तिन्ही आरोपींना गुन्हेगारी स्वरुपात दोषी ठरवले आणि  99 रुपयांचे दंड आकारण्यात आले आहे. असे केले नाही तर त्यांना सात दिवस तुरुंगवास होऊ शकतो. 
बचाव पक्षाने एफआयआर राजकीय सूडबुद्धीचा परिणाम असल्याचा दावा केला आहे. .
Edited By- Priya Dixit