गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (21:48 IST)

आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला मुंबई सत्रन्यायालयाने जामीन मंजूर

फरार बुकी व उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.  आरोपी अनिक्षा जयसिंघानीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
 
आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला मुंबई सत्रन्यायालयाने ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तपासात सहकार्य करण्याच्या अटीशर्तीही कोर्टाने बजावल्या आहेत.  
 
कोण आहे अनिक्षा?
 
अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिक्षावर महाराष्ट्र, गोवा आणि आसाममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. अनिक्षा ही कायद्याची पदवीधर आहे. ती उल्हासनगरची रहिवासी असून, स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा बऱ्याच दिवसांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor