Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Delhi LPG Cylinder Blast सिलिंडरच्या स्फोटानंतर भीषण आग, चार जणांचा गुदमरुन मृत्यू

Updated: बुधवार, 30 जून 2021 (09:42 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यास आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठविला. अद्याप यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
 
दिल्लीच्या शाहदारा भागात सिलिंडरच्या स्फोटानंतर मोठी आग लागली आणि गॅसगळतीने चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. ही घटना रात्री उशिरा घडली. जखमीला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 
 
अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की, ही घटना शाहदराच्या फ्रेश मार्केट भागात घडली. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फ्रेश बाजार परिसरातील भीकमसिंह कॉलनीतून एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याचा फोन आला. त्यानंतर अग्निशमन दलाची  वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली. आग आटोक्यात आणून 5 जणांना वाचविण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एलपीजी सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरल्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 25 टक्के जळल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्यांना हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments