गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (15:50 IST)

कर्नाटकात कर्ज फेडता न आल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली

बंगलोर एजन्सी. कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमारैया सुरपुरा, त्यांची पत्नी शांतम्मा, मुलगा शिवराज, मुली सुमित्रा, श्रीदेवी आणि लक्ष्मी हे तलावामध्ये मृतावस्थेत आढळले. एका पोलिस आधिक्याने बातमी एजन्सी पीटीआयला सांगितले की ते कदाचित सकाळी दहाच्या सुमारास बुडले असतील, परंतु त्यांचे शरीर पाण्यात तरंगताना दिसले तेव्हा आम्हाला याबद्दल माहिती मिळाली.
 
त्याच वेळी, स्थानिक सावकारांकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असल्याने या कुटुंबाने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे. हे सर्व लोक फळबाग पिके घेण्यास अपयशी ठरले आणि सावकारांच्या कर्जाने त्रस्त झाले, असे पोलिसांनी म्हटले आहे आणि शेवटी कुटुंबातील सदस्यांनी तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचा गुन्हा दाखल करून पोलिस या प्रकरणात अधिक माहिती गोळा करीत आहेत.