गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 जून 2021 (08:11 IST)

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून?

Rainy session
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होऊ शकते. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे.
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरवण्यासाठी गेल्या आठवड्यात समितीची बैठक घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप   यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेच्या या अधिवेशनात 20 दिवस कामकाज चालेल. यादरम्यान, सरकार अनेक बिले सादर करु शकते. तसेच कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्यामच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.
 
कोरोना नियमांचे होणार्याल पालन अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणार्या‍ सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासले जाणार आहे.