मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 1 जुलै 2023 (12:58 IST)

Video शेतकऱ्याने आपली गाय सिंहीणीच्या तोंडातून सोडवली

Lioness attack on cow
Farmer saves cow from lioness गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आपल्या गायीला सिंहीणीच्या तावडीतून वाचवल्याचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
भाजपा नेता व केशोद नगर पालिकेचे सदस्य विवेक कोटादिया यांनी येथून 65 किमी अंतरावर कोडिनार तालुक्याच्या अलीदार गावाजवळ घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. कोटादिया यांनी शेतकर्‍याचे नाव किरीट सिंह चौहान असे सांगितले आहे. जिल्ह्यात गीर वन्यजीव अभयारण्य आहे, ज्यात आशियाई सिंहांची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे.
 
कारच्या विंडोतून काढलेल्या या व्हिडिओत एक गायीला सिंहीणीच्या तावडीतून स्वत:ला सोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. गाईने सिंहिणीला रस्त्यावर ओढले असता, सिंहिणीने तिचा गळा पकडण्याचा प्रयत्न केला.