मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:08 IST)

काश्मिरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यावर गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्हा रुग्णालयात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मा यांचा मृत्यू झाला. किश्तवाड येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी रुग्णालयात शिरलेल्या दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. यामध्ये चंद्रकांत शर्मा आणि त्यांचा सुरक्षा रक्षक (पीएसओ) जखमी झाले होते. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकाचा तात्काळ मृत्यू झाला. तर चंद्रकांत शर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  
 
चंद्रकांत शर्मा यांना मारण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला होता. बुरखा परिधान करून दहशतवादी रुग्णालयात शिरले. ओपीडीमध्ये येऊन या दहशतवाद्यांनी चंद्रकांत यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात चंद्रकांत गंभीर जखमी झाले तर त्यांचा बॉडीगार्ड जागीच ठार झाला. गोळीबारानंतर सुरक्षारक्षकाकडील शस्त्र घेऊन हे दहशतवादी पळून गेले.