मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुकची मोठी चूक, काश्मीरला वेगळा देश म्हटले नंतर माफी मागितली

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये काश्मीरला एक वेगळं देश दर्शवले. यावर वाद वाढल्यानंतर फेसबुकने आपली चूक मान्य करून माफी मागितली.
 
सोशल मीडियाच्या प्रसिद्ध कंपनीने म्हटले की 'आम्ही चुकीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये ‘काश्मीर’ ला देश आणि क्षेत्र यादीत सामील करून घेतले. इराणी नेटवर्कच्या प्रभावामुळे असे घडले.'
 
फेसबुकने म्हटले की यासाठी जवाबदार लोकांनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता परंतू कंपनीने त्यांचा दोरा इराणहून शोधून काढला आहे.
 
उल्लेखनीय आहे की फेसबुकच्या सायबर सिक्योरिटी पॉलिसी प्रमुख नॅथनियल ग्लेचरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की काश्मीर भारताहून वेगळी सत्ता आहे. आम्ही अशा हजारो फेक पेजेस आणि अकाउंट हटवले आहे, जे आपत्तीजनक सामग्री पोस्ट करत होते. यात 513 पेज, समूह आणि अकाउंट सामील आहे जे इजिप्त, भारत, इंडोनेशिया, इस्रायली, इटली, काश्मीर, कझाकस्तान आणि व्यापक स्तरावर मिडिल ईस्ट राष्ट्र आणि उत्तरी आफ्रिकेहून चालवले जात होते. आपत्तीनंतर काश्मीरचे नाव या यादीतून वेगळे केले गेले.