शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (18:23 IST)

इंस्टाग्रामवर नाव बदलणारा फीचर

स्वत: ला गंभीर किंवा व्यावसायिक दाखविण्यासाठी जे वापरकर्ते इंस्टाग्रामवर नाव बदलू इच्छित आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. प्रत्यक्षात, फेसबुकचे स्वामित्व असलेले अॅप इंस्टाग्राम नेम एडिट करणार्या फीचरवर तपासणी करत आहे. त्याचवेळी यात जुने नाव 14 दिवसांसाठी रिझर्व राहील, जे या अंतिम मुदतीत बदलता येईल. त्याची माहिती ट्विटरवर शेअर केली गेली आहे.
 
इंस्टाग्रामवर बरेच लोक कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत एक अद्वितीय नाव ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि काही वर्षानंतर कामावर गेल्यावर आपल्या नावाचा नवीन खाता तयार करतात, ज्यामध्ये गंभीरता दिसून येते. या प्रकरणात, लोक जुने खाते हटवित किंवा निष्क्रिय करतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम नेम एडिटिंग टूल आणत आहे.