या यादीत आइसलँड, नॉर्वे व फिनलँड या देशांचे स्थान अव्वल असून, ४७व्या क्रमांकावर असलेला बांगला देश दक्षिण आशियात सर्वात वरच्या स्थानावर आहे. या वर्गवारीत भारताची घसरण ही ‘आरोग्य आणि जीवनमान’ आणि ‘महिलांचा आर्थिक सहभाग आणि त्यांना उपलब्ध संधी’ या दोन निर्देशांकांमुळे झाली आहे. आरोग्याच्या बाबतीत स्त्री-पुरुष असमानतेत भारत १४१व्या स्थानावर म्हणजे शेवटून चौथा आहे. स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलाच्या जन्माचा आग्रह, यामुळे ही असमानता वाढत असल्याचे मत अहवालात आहे.