रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (15:07 IST)

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून फॅबइंडियाला नोटीस

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने फॅबइंडियाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फॅबइंडिया सूती रेडीमेड कपड्यांची विक्री खादीची उत्पादनं म्हणून करत आहे. कंपनीने अशा विक्रीसाठी परवानगीही घेतली नसल्याचा दावा आयोगाने केला आहे. या नोटीसमध्ये आयोगाने फॅबइंडियाला आपली बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. या अवधीमध्ये फॅबइंडियाने आपली बाजू मांडली नाही, तर खादी आणि ग्रामोद्योग आयोग, खादी मार्क रेग्युलेशनचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुढील कारवाई करेल. “फॅबइंडियाद्वारे खादी उत्पादनं म्हणून विकलेले कपडे आणि त्यांच्या किंमतीची गांभीर्याने तपासणी केल्यानंतर समजलं की, फॅबइंडियाने या कपड्यांना ‘फॅबइंडिया कॉटन’चं लेबल लावलं आहे,” असा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे. नोटीसमध्ये पुढे लिहिलं आहे की, “कपड्यांच्या प्राईस टॅगवर खादी शब्द लिहिलेला आहे. यावरुनच स्पष्ट होतं की, फॅबइंडिया खादीची उत्पादनं विकत नाही, तर काढता येणाऱ्या प्राईस टॅगवर खादी शब्द लिहून ग्राहकांची दिशाभूल करत आहे. हे काम बेकायदेशीर आहे.