लग्न सभागृहाची भिंत कोसळली, २५ ठार, ३० जखमी
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये 8 महीला आणि 5 लहान मुलांचाही समावेश आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक वादळासह आलेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळ्याचं सांगितलं जात आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे लग्नात आलेल्या पाहुण्यांनी त्या भिंतीचा आसरा घेतला. मात्र, सोसाट्याच्या वा-याचा दबाव सहन न झाल्याने भिंत कोसळली आणि अनेक जण भिंतीखाली सापडले. अचानक झालेल्या या घटनेमुळे लग्न सभागृहात गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.