मुस्लीम मुलींच्या सामुदायिक विवाहाचे यूपीत आयोजन
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मुस्लीम समाजातील गरीब मुलींच्या सामुदायिक विवाहांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम समाजातील गरीब मुलींच्या सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यास परवानगी दिली असून, राज्य सरकारने आपल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात त्याचा सहभाग केला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मोहसिन रझा यांनी येथे दिली. राज्यातील जनसंख्येच्या 20 टक्के मुस्लीम समाजाची जनसंख्या आहे. या प्रकारचा प्रस्ताव तयार केला आहे. या सामुदायिक विवाहात प्रत्येक नववधूला 20 हजार रुपये दिले जाणार आहेत.