शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (12:52 IST)

आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन! मोदी सरकारने सुरू केली ही खास योजना

money
दुकानदारांना मिळणार पेन्शन केंद्रातील मोदी सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. वेगवेगळ्या वर्गांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. अशीच एक योजना देशातील व्यावसायिकांसाठी चालवली जात आहे. या योजनेचे नाव राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे.
 
 या योजने मध्ये नोंदणी करण्यासाठी आपल्या  व्यवसायाची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये किंवा त्याहून कमी असावी. ही एक ऐच्छिक योजना आहे, ज्यामध्ये व्यावसायिकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन मिळेल. मोदी सरकारने ही योजना 2019 मध्ये सुरू केली होती. योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या वतीने केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला (पती/पत्नी) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. अधिक माहितीसाठी Labor.gov.in आणि maandhan.in वर लॉग इन करू शकता.

NPS नावनोंदणीसाठी, आपल्या कडे आधार कार्ड आणि बचत बँक खाते, जन धन खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. योजनेत केंद्र सरकारकडून नोंदणी करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यातही योगदान दिले जाते. या योजनेत सामील होणार्‍यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत बचत बँक खाते किंवा जन धन खात्यातून ऑटो डेबिटद्वारे योगदान द्यावे लागेल.व्यावसायिकाचे वय 18 ते 40 पर्यंत असले पाहिजे.