शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गोमूत्र प्या आणि गरबा खेळा, भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून गोंधळ

नवरात्र जसजशी जवळ येत आहे तसतशी देशातील विविध ठिकाणी दुर्गापूजेची तयारी सुरू झाली आहे. भव्य पंडाल आणि गरब्याची खूप चर्चा आहे. दरम्यान मध्य प्रदेश भाजपचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांच्या वक्तव्यामुळे सत्तेच्या गोटात खळबळ उडाली आहे. चिंटू वर्मा यांनी गरब्यात प्रवेश करण्यापूर्वी लोकांना गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की जो कोणी गरब्यासाठी येईल त्याला गोमूत्र प्यायला द्यावे.
 
गोमूत्र पाजण्याचे कारण काय?
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर गरबा पंडालमध्ये हजारो लोक सहभागी होतात. यामध्ये इतर धर्माचे लोकही सहभागी होतात. गर्दीचा फायदा घेत हे लोक मुलींची छेड काढतात. या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजप नेते चिंटू वर्मा यांनी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. इंदूरचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांचे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
 
चिंटू वर्मा म्हणाले की, गरब्यात प्रवेश करताना लोकांना गोमूत्र पिण्यास लावले पाहिजे. हिंदू धर्माच्या लोकांना गोमूत्र पिण्यास हरकत नाही, पण ते इतर धर्माचे लोक असतील तर ते गोमूत्र कधीच पिणार नाहीत. अशा परिस्थितीत गोमूत्र हा एकमेव मार्ग आहे का, लोकांचे आधार कार्डही तपासले जाऊ शकते, असा प्रश्न चिंटू वर्मा यांना विचारला असता यावर त्यांनी उत्तर दिले की, आधार कार्ड सहज एडिट करता येते. त्यामुळे लोक चुकीचे आधारकार्ड दाखवूनही गरब्यात प्रवेश करू शकतात.
 
छत्तीसगडमध्येही मागणी करण्यात आली
चिंटू वर्मा म्हणाले की, पाखंडी सुद्धा गरब्यात सहभागी होण्यासाठी टिळक लावतात. अशा परिस्थितीत त्यांची ओळख पटवणे शक्य नसते. त्यामुळे गोमूत्र हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे इतर धर्माच्या लोकांना गरब्यात प्रवेश करण्यापासून रोखता येईल. काल छत्तीसगडमध्येही अशीच मागणी करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेसह अनेक संघटनांनी गरब्याला येणाऱ्या लोकांना गंगाजल उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती.