1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (12:28 IST)

आठव्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थिनीची आत्महत्या

Uttar Pradesh
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील साहिबाबाद पोलीस स्टेशन परिसरात 20 वर्षीय एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. एका पोलीस अधिकारींनी ही माहिती दिली आहे. दिल्लीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीच्या  मानसिक आरोग्यावर उपचार सुरू होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार साहिबाबादचे पोलीस अधिकारी म्हणाले की, “मृत विद्यार्थिनी तिच्या आई-वडिलांसोबत ग्रुप हाउसिंग सोसायटीत राहत होती. सोमवारी तिने अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावरून उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला.
 
तसेच “तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, ती सुमारे दीड वर्षांपासून नैराश्यात होती. तिच्या उपचारासाठी सल्ला घेत होते.
 
तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. व पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस अधिकरींनी सांगितले.  

Edited By- Dhanashri Naik