Festival Posters
✕

बिहारमध्ये उड्डाणपुलाखाली अडकले विमान

Updated: शनिवार, 30 डिसेंबर 2023 (11:23 IST)

विमानाचे काही अवशेष घेऊन माल वाहतूक ट्रक घेऊन आसामला नेत असताना ट्रक फ्लायओव्हरच्या खाली अडकला. हे संपूर्ण प्रकरण बिहारच्या मोतीहारीच्या NH28 पिपराकोठी ओव्हरब्रिजचे आहे. लोकांना ही बाब समाजतातच लोकांनी विमान बघण्यासाठी गर्दी केली. काही लोक सेल्फी घेऊ लागले. मिळालेल्या माहितीनुसार, एका मोठ्या ट्रक लॉरीमध्ये विमानाची वाहतूक केली जात होती. ओव्हरब्रिजमध्ये विमान अडकल्याची बातमी समजताच आजूबाजूच्या लोकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. अनेक लोक पुलावर अडकलेल्या विमानाचे फोटो आणि सेल्फी काढण्यात व्यस्त होते, तर पोलीस ओव्हरब्रिजच्या खाली एका लॉरीवर ठेवलेले विमान कसेतरी काढण्याचा प्रयत्न करत होते.
 
त्यानंतर ट्रक लॉरीचे सर्व टायरची हवा काढून ओव्हरब्रिजखाली अडकलेल्या विमानाला अथक प्रयत्नानंतर  बाहेर काढण्यात आले. लोकांनी आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. 

Edited By- Priya DIxit   
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments