Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीएम मोदींनी दिले सर्वात कमी वेळेचे भाषण...

Updated: मंगळवार, 15 ऑगस्ट 2017 (23:28 IST)
स्वातंत्र्य दिनाचे भाषण खूप मोठं असतं, अशी तक्रार करणारी पत्रे देशभरातून पंतप्रधान कार्यालयात आली होती. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी सर्वात छोटे भाषण करणार असल्याचे त्यांनी  मागच्या वेळी ‘मन की बात’मध्ये सांगितले होते.  गेल्या चार वर्षाच स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या झालेल्या भाषणांमध्ये हे भाषण कमी वेळाचे ठरले आहे. यामागचे कारण पंतप्रधान मोदी यांनी याआधीच स्पष्ट केले होते. पंतप्रधान झाल्यावर २०१४ मध्ये मोदींनी लाल किल्ल्यावरून पहिले भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी देशातील जनतेशी ६५ मिनिटे संवाद साधला होता. २०१५ मध्ये ८६ मिनिटे आणि २०१६ मध्ये ते ९४ मिनिटे त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. या महत्त्वपूर्ण भाषणांमध्ये त्यांनी विविध मुंद्दयांना हात घातला होता. गेल्या तीन वर्षांपासून मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. त्यांनी आज पंतप्रधान म्हणून चौथे भाषण केले.
 
सकाळी ७.३० वाजता लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यावर सुरु झालेले भाषण ८.३० वाजता संपले. या भाषणात त्यांनी महिला सबलीकरण, गोरखपूरमधील बालमृत्यूची घटना, ‘न्यू इंडिया’ अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी ते केवळ ५४ मिनीटेच बोलले.
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments