1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 7 जून 2021 (13:42 IST)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील

कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्याने आजपासून देशात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायंकाळी पाच वाजता देशाला संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
अशी अपेक्षा आहे की अनलॉक करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना सावधगिरी बाळगावे असे आवाहन करतील तसेच लसीकरणासंदर्भात देखील संदेश दिला जाऊ शकतो.