Daily Horoscope
✕

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा फोन टॅपिंगचा आरोप! म्हणाले....पंतप्रधान मोदी

Updated: शनिवार, 14 नोव्हेंबर 2026 (11:34 IST)
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक गंभीर आरोप केला आहे. आपला फोन टॅप होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वास्तविक, राहुल गांधी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ स्टेटस शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक युझर राहुल गांधी यांना विचारतो, "पंतप्रधान मोदी म्हणत आहे की तुम्हाला परकीय मदत मिळत आहे. तुम्ही म्हणत आहात की पंतप्रधान मोदींना परदेशातून नियंत्रित केले जात आहे. याचा पुरावा कुठे आहे?" या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी व्हिडिओमध्ये आपला फोन टॅप होत असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?
इन्स्टाग्रामवर एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "पुरावा इथे, या फोनमध्ये आहे. पंतप्रधानांना हे माहीत आहे कारण ते माझा फोन टॅप करतात. ज्या क्षणी ते समोरासमोरच्या चर्चेसाठी येतील, तेव्हा परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे, कोण गद्दार आहे, तो किती काळापासून गद्दार आहे, आणि अशा अनेक गोष्टी ज्या मला माहीत आहे आणि माझ्या फोनमध्ये आहेत, हे सर्वांना कळेल."
ALSO READ: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानं थांबवली

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments