शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (16:59 IST)

पत्नीसोबत बाईकवरून जात असताना RSS कार्यकर्त्याची हत्या

केरळमधील माम्बरम जिल्ह्यात सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, 27 वर्षीय संजीतची त्याच्या पत्नीसमोर सकाळी 9 वाजता हत्या करण्यात आली. इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ची राजकीय शाखा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या कार्यकर्त्यांचा या हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास संजीत पत्नीसह बाईकवरून जात असताना कारमध्ये आलेल्या ४ जणांनी प्रथम संजीतच्या दुचाकीला कारने धडक दिली आणि त्यानंतर दुचाकी घसरताच संजीतवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. नंतर हल्लाखोरांनी तेथून पळ काढला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ संजीतला जिल्हा रुग्णालयात नेले मात्र त्याला वाचवता आले नाही.
 
घटनेनंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) आरोप केला की हल्लेखोरांनी संजीतच्या वाहनाचा पाठलाग केला आणि नंतर त्याच्या दुचाकीला धडक दिली. संजीत रस्त्यावर पडल्यानंतर पत्नीसमोरच त्याचा खून करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी संघ कार्यकर्त्याच्या हत्येचा निषेध केला आणि ही "नियोजित हत्या" असल्याचा आरोप केला आणि राज्यात अशा घटना घडण्यासाठी पोलिस आणि राज्य सरकारच्या अपयशाला जबाबदार धरले.