मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (17:58 IST)

शिकवणीसाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला, बलात्कारानंतर हत्या झाल्याची शक्यता

उत्तरप्रदेशातील पिलिभीत मध्ये बारखेडा पोलिस ठाण्यांतर्गत शनिवारी सकाळी घरातून शिकवणीचा अभ्यास करण्यासाठी बाहेर पडलेल्या 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. अल्पवयीन इंटरमिजिएट विद्यार्थिनीवर बलात्कार केल्यानंतर खून झाल्याचा संशय आहे.
बारखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी एक विद्यार्थिनी घरातून शिकवणीसाठी बाहेर पडली होती. बराच वेळ न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. शोध घेऊनही ती  सापडली नाही, तेव्हा अपहरण झाल्याची शक्यता पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रात्री उशिरा पोलिसांना विद्यार्थिनीचा मृतदेह उसाच्या शेतात पडलेला आढळून आला. घटनास्थळी एक सायकल आणि चप्पलही पोलिसांना सापडली आहे. एएसपी डॉ पीएम त्रिपाठी यांनी सांगितले की, सर्व मुद्यांचा तपास सुरू आहे. सध्या अज्ञाताविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.