PMAY ग्रामीण योजनेचा पहिला हप्ता आज देणार, 700 कोटींची तरतूद
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (14 नोव्हेंबर) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्रिपुरातील 1.47 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण म्हणजेच PMAY-G चा पहिला हप्ता जारी करणार आहेत.
या अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 700 कोटींहून अधिक रुपये थेट जमा केले जातील, असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं.
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर आणि त्रिपुराची अद्वितीय भौगोलिक-हवामानाची स्थिती लक्षात घेऊन राज्यासाठी 'कच्चा' घराची व्याख्या विशेषत: बदलण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात कच्चे घर असलेल्या लोकांना मोठ्या संख्येने घरासाठी मदत मिळू शकणार आहे.