मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (19:47 IST)

महाराष्ट्रातील गडचिरोली येथे पोलिसांच्या C-60 युनिटसोबत झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 युनिटने ग्यारापट्टी जंगलात झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत तीन जवानही जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी याला दुजोरा दिला आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक शोध मोहीम राबवत असताना ग्यारापट्टीच्या जंगल परिसरात असलेल्या धानोरा येथे ही चकमक झाली. कमांडोना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. अजूनही शोध मोहीम सुरू असून, ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा वाढू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
 
मार्डिनटोला गावाजवळ सकाळी चकमक सुरू झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. तीन जखमी पोलिसांना उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आले. त्यांनी सांगितले की, छत्तीसगडच्या जंगलातून काही नक्षलवादी गडचिरोलीला जात असल्याची माहिती पोलिसांच्या कमांडो टीमला मिळाली होती.