मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (15:21 IST)

मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ल्यात रायफल अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद

मणिपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील चुडाचंद्रपूर जिल्ह्यातील सिंगत भागात दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसरची पत्नी आणि एका मुलासह काही जवान शहीद झाले.
 
या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या सीओसह ४ जवान शहीद झाले. त्याचवेळी या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला. मात्र, सध्या यासंदर्भात लष्कराकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
 
मणिपूरचे मुख्यमंत्री नॉन्गथोम्बम बिरेन सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत म्हटलं की असे भ्याड कृत्य सहन केलं जाणार नाही. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
 
या हल्ल्यामागे मणिपूरच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचं म्हटलं जात आहे.