शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (16:34 IST)

संजय निरुपम यांना दणका

फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागणाऱ्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना दणका बसला आहे. मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची निरुपम यांची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.

मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारित फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी आहे. रेल्वे पादचारी पूल, स्काय वॉकवर फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.

 शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलच्या 100 मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, पालिका मंडईच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसता येणार नाही. आणि रेल्वे पादचारी पुल, स्काय वॉकवर फेरीवाल्यांना मनाई आहे.