गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जयललिता यांच्या नंतर आता शशिकला

तामिळनाडू येथील सर्वात प्रब्वी असलेल्या जयललितांचं निधन झाल आहे. जयललिता यांच्या पक्षाचे लोकसभेत 39 तर राज्यसभेत 18 खासदार असलेल्या पक्षाचं पुढे काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न समोर आला आहे. मात्र तात्पुरते तरी आता  पनीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे. मात्र राजकीय विश्लेषक असे मानत की आता सर्व पक्षाची धुरा जयललितांची परममैत्रिण शशीकला नटराजन यांच्याकडेच जाणार आहेत.
 
शशीकला नटराजन जयललितांच्या आयुष्यातली  एक रहस्य आहेत. त्या नातेवाईक नाहीत मात्र जय ललिता यांच्या मैत्रीण आहेत. या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही.मात्र शशिकला यांना जय ललिता यांच्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती.किंबहुना अनेक निर्णयावर त्यांचे मत विचारात घेतले जात होते.आजवर पडद्या मागे राहणारी  शशीकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे. कारण तमिळ जनता तरी त्यांनाच जयललिता यांचा राजकीय वारस म्हणून पाहते आहे.