...म्हणून देशात सरसकट लसीकरणाला परवानगी नाही

vaccine
नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 7 एप्रिल 2021 (08:56 IST)
केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका

देशातील काही राज्यांकडून सरसकट सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मागणी केली जात आहे. पण केंद्र
सरकारकडून त्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

यामागचे नेमके कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर केंद्र सरकारने अधिकृतरीत्या भूमिका स्पष्ट केली आहे. देशात कुणाला लस हवी यापेक्षा त्याची कुणाला जास्त गरज आहे या उद्देशातून लसीकरण सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आणि यामागचे कारण सांगितले.

अनेकांनी मला विचारले की, देशात सर्वच वयोगटातील नागरिकांना का लस दिली जात नाही. मुळात लसीकरणामागे आपली प्रमुख दोन उद्दिष्टे आहेत. मृत्यू रोखणे आणि आरोग्य यंत्रणेला सांभाळणे.

त्यामुळे देशात कुणाला लस हवी यापेक्षा लसीची कुणाला जास्त गरज आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लसीकरण सुरू आहे, असे भूषण म्हणाले.
केंद्र सरकारने देशात 45 वर्षे वोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे.पण याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे लसीकरणासाठी घालून देण्यात आलेली वयोमर्यादेची अट काढून टाकण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत एकूण 43 लाख लोकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी दिली. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. तर आतापर्यंत लस घेतलेल्यांची संख्या 8 कोटी 31 लाखांर्पंत पोहोचली आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची स्थापना
देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय टास्क फोर्सची ...

पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद : ...

पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद : महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधात लढाईविषयी पंतप्रधानानी केले कौतुक
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

INS विक्रमदित्याला आग, नौदलाने सांगितले- सर्व कर्मचारी ...

INS विक्रमदित्याला आग, नौदलाने सांगितले- सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत
शनिवारी सकाळी भारताच्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रमदित्य (INS Vikramaditya) याला भीषण आग ...

खबरदारी घेतल्यावर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही -वैज्ञानिक ...

खबरदारी घेतल्यावर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही -वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन
नवी दिल्ली. कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने, नरेंद्र मोदी सरकारचे केंद्राचे ...

नागपुरात एनसीबीने केली कारवाई, 2 किलो ड्रगसह कुरिअर ...

नागपुरात एनसीबीने केली कारवाई, 2 किलो ड्रगसह कुरिअर कंपनीच्या मालकाला अटक
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) महाराष्ट्रातील नागपूर येथील कुरिअर कंपनीचे मालक नचिकेत ...