सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2017 (12:41 IST)

श्रीनगर येथे मोठा तणाव पुन्हा मतदान सुरुवात

नेहमीच तणावात आणि आतंकवादी कृत्याने घूमसत असलेले काश्मीर पुन्हा मोठ्या तणावात आहे. तर श्रीनगरच्या काही भागात रविवारी झालेल्या हिंसाचारात जमावाने ईव्हीएम मशीन्सची मोडतोड करून त्यांची जाळपोळ केल्याचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले .यामध्ये  33 ईव्हीएम मशीन्सची नासधूस झाली असून 8 ईव्हीएममशीन्स हरवल्या आहेत.  तर अनेक फुटीरवादी नेत्यांनी  जम्मू काश्‍मीरमध्ये निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. तर झालेल्या हिंसाचार इतका मोठा होता की  किमान 8 नागरिक मारले गेले आहेत.  शंभरावर सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारच्या हिंसाचारामुळे श्रीनगरमध्ये केवळ 7 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने श्रीनगरमध्ये 38 मतदान केंद्रांवर गुरुवारी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आणि सैनिकांनी मोठ्या प्रमाणत बंदोबस्त ठेवला आहे.