शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:40 IST)

फटाके फोडण्यासाठी वेळ पाळली नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ची ठरवून दिलेली वेळ धुडकावून लावल्याचे चित्र पहायला मिळाले. मुंबई-ठाण्यासह सर्व परिसरात रात्री उशिरापर्यंत धडाडधूम सुरू असल्याचे चित्र पाडवा आणि भाऊबिजेला दिसले.  दरम्यान, नियम मोडल्याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून शंभराहून अधिकव्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला. 
 
ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात बुधवारी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर विविध पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाईला वेग आला. मात्र मुंबईचे दोन्ही जिल्हे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत  कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत मरिन लाईन्स परिसरात सात जणांकडून दंड वसूल केला. त्यापाठोपाठ परिमंडळ ४ अंतर्गत ३७ ते ४० गुन्हे दाखल झाले आहेत. यात आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत पाच गुन्हे दाखल असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.