मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (15:04 IST)

म्हणून आम्ही शिवसेना फोडली’,अखेर भाजप नेत्याने दिली कबुली

BJP Party
भाजपाने आपण महाराष्ट्रात शिवसेना का बिहारमध्ये नितीश कुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून नितीश कुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. कारण भाजप देशभरातील राज्यात आपलीच सत्ता असावी असा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रक्रियेत आज भाजपच्या एका मोठ्या नेत्याने महत्त्वाला खुलासा केला आहे. भाजपनेच शिवसेना फोडल्याचे या नेत्याने म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या फुटीमागे भाजपच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला, असा दावा केला आहे. त्यामुळेच जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी भाजपसोबत फारकत घेऊन युती तोडली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला. नितीश कुमार यांच्या या धक्कातंत्रामुळे भाजपला जोर का झटका लागला. नितीश कुमार फक्त एवढ्यावरच थांबले नाही तर, त्यांनी आरजेडी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी करत सत्तास्थापनेचा दावा केला.दरम्यान, बिहारचे भाजप नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे, असे असताना भाजपाने आपण महाराष्ट्रात शिवसेना का फोडली हे सांगत नितीश कुमार यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. इतकंच नाही तर, आज जे काही घडलं, ते बिहारच्या जनतेशी आणि भाजपसोबतचा विश्वासघात आहे. शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले, असे धक्कादायक विधानही सुशीलकुमार यांनी केले आहे.
 
सन २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी एनडीए आघाडी अंतर्गत निवडणूक लढवली होती आणि जनतेने जेडीयू आणि भाजपला पाठिंबा दिला होता. जेडीयूने बिहारचा विश्वासघात केला आहे. मतदारांनी दिलेल्या मतांशी खेळले आहेत, असा आरोप बिहारचे भाजपा नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. आम्ही ७४ जागा जिंकण्यात यशस्वी झालो, पण पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आणि एनडीए आघाडीत नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. पण आज जे काही घडले तो बिहारच्या जनतेशी आणि भाजपसोबतचा विश्वासघात आहे.