suvichar
✕

सुवर्ण मंदिराबाहेर पाच दिवसांत तिसरा स्फोट, पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले

Updated: गुरूवार, 11 मे 2023 (09:43 IST)
 
या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉरिडॉरच्या बाजूला असलेल्या श्री गुरू रामदास सरायजवळ पहाटे एक वाजता हा ताजा स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांनी एक तरुण आणि एका महिलेसह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. दोघांनाही जवळच्या सरायातून ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या मुलाच्या बॅगेतून काही इंजेक्शन्सही सापडली आहेत.
 
यापूर्वी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटजवळील मिठाईच्या दुकानात चिमणीमुळे 2 स्फोट झाले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार पोलिसांना स्फोटाच्या ठिकाणाहून एक पत्रही मिळाले असून, ते ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये शनिवारी संध्याकाळी पहिला भीषण स्फोट झाला.
 
अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटजवळ असलेल्या मिठाईच्या दुकानात चिमणीमुळे स्फोट झाला, त्यानंतर तेथे उपस्थित भाविक घाबरले. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, तेथून सुवर्ण मंदिर अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे. वृत्तानुसार, स्फोट इतका जोरदार होता की, खडे भाविकांच्या अंगावर पडले आणि काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments