Festival Posters
✕

Turkey Earthquake: भूकंपात बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकाच्या मृत्यूची पुष्टी

Updated: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (23:49 IST)
भूकंपानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन तुर्कस्तानमधील परिस्थिती आणि तेथे अडकलेल्या भारतीयांची माहिती दिली. असे त्यांनी सांगितले 1939 नंतर तुर्कस्तानमधील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्त भागात दहा भारतीय अडकले असले तरी ते सुरक्षित आहेत. यासोबतच एक नागरिक बेपत्ता झाल्याची माहितीही त्यांनी दिली. 
 
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अडकले आहेत. त्यांच्या पैकी काही जिवंत तर काही जण मृत्यूशी लढाई हरले आहेत. दरम्यान, अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) नेही मदतकार्यात सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. नासाने आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार नासाचे शास्त्रज्ञ तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपग्रस्त भागांची उपग्रह प्रतिमा आणि डेटा संबंधित सरकारांशी सतत शेअर करत आहेत. त्यामुळे मदतकार्यात मदत होत आहे.
 
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments