1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (13:03 IST)

हेल्मेटमध्ये निघाला साप Viral Video

Viral Video of Snake in Helmet
दुचाकीवर बाहेर पडायचे असेल तर हेल्मेट घातलं पाहिजे हा सल्ला दिला जातो. सुरक्षतेसाठी हेल्मेट घालणे योग्य असल्याचे सर्वांना माहित असेल पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ बघून हेल्मेट घालण्याआधी ते तपासणे कोणीही विसणार नाही.
 
हा व्हिडीओ बघून नेटकरी घाबरत आह. यात एका तरुणाच्या हातात हेल्मेट असून तो चिमट्याने त्यातून काही काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर कळून येतं की तो चिमट्याच्या मदतीने हेल्मेटच्या लपून बसलेला साप काढतो. तरुणाला हेल्मेट घालण्याआधी त्यात साप दिसला म्हणून अनर्थ टळला. परंतू हेल्मेटच्या इतक्या आत साप असावा याची कल्पना देखील कोणी करु शकत नाही.